ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
संपूर्ण जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. भारतात देखील लॉक डाऊन चा कालावधी 3 मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. दरम्यान, 20 मे पासून काही उद्योगधंदे सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, यासाठी काही अटी देखील घालण्यात आल्या आहे.
याबाबत सरकारकडून आज या कामांची यादी जारी करण्यात आली आहे. यामध्ये म्हटले आहे की, कोरोना संक्रमित भागात अशी कामे सुरू करण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे.
आज जारी करण्यात आलेल्या नव्या नियमांनुसार आता लॉक डाऊनच्या काळात ई कॉमर्स कंपन्याना आवश्यक वस्तूंशिवाय इतर कुठल्याही प्रकारच्या वस्तूंची विक्री करता येणार नाही.
केंद्र सरकारकडून सूट दिलेल्या कामात आयुष सह आरोग्य सेवा, कृषी, मत्स्य व्यवसाय, पशुपालन, मनरेगा अंतर्गत कामे तसेच वीज, पाणी, गॅस या अत्यावश्यक सेवांचा समावेश करण्यात आला आहे.
सरकारने आर्थिक आणि सामाजिक क्षेत्र, मीडियाला देखील परवानगी दिली आहे. मात्र दिलेल्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच सरकारने कामकाजाच्या ठिकाणी काम करण्यासाठी आवश्यक त्या गाईडलाईन निश्चित करण्याचे आदेशही दिले आहेत.