ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व देशात लॉक डाऊन जारी करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकीकडे सरकार, आरोग्य यंत्रणा प्रयत्न करत आहे. मात्र, अशातच भाजपच्या एका नगरसेवकाने या आदेशाकडे दुर्लक्ष करत जोरदार बर्थ डे पार्टी चे आयोजन केले. या नगरसेवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात लॉक डाऊन सुरू असून देखील पनवेलमधील भाजपचे नगसेवक अजय बहिरा यांनी आपल्या मित्र मंडळीना बरोबर घेऊन वाढदिवसाचे सेलिब्रेशन केले. त्यानंतर पनवेल शहर ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. नगरसेवकासह 11 साथीदारांवर ही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बर्थ डे पार्टी मध्ये सोशल डिस्टन्सिंगचं पालन ही केले नव्हते तसेच जमावबंदी असताना एकत्र येणे, मास्क न घालणे आदी गुन्हे त्यांच्यावर दाखल करण्यात आले आहेत.