प्रतिनिधीC /दहिवडी :
सध्या लॉकडाऊन च्या काळात अनेक वाहनाच्यांवर अत्यावश्यक सेवा असे फलक लावून काळाबाजार सुरू झाला आहे. तरी पोलिसांनी अशा फलक असलेल्या गाडय़ा तपासून काय वाहतूक होते याची खात्री करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे. त्याचप्रमाणे जिल्हाधिकायांचे आदेश धाब्यावर बसवून तसेच तहसिलदारांनी तंबी देऊन ही माणखटाव तालुक्यातील काही पेट्रोल पंपावरती रात्रीच्या वेळी डंपर, ट्रक जेसीबी या मध्ये मोठया प्रमाणात अवैध्यपणे डीझेल पेट्रोल विक्री केली जात आहे. तसेच पंप चालकाच्या ओळखीच्या व्यक्तीस विनासायास पेट्रोल डिजेल मिळत आहे त्या ’मुळे नक्की काळा बाजार कोण रोखणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. सर्रास बिनकामाची वाहने रस्त्यावर उतरत आहेत ह्यामुळे पोलिस प्रशासनाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ज्यामुळे आमच्या येथे पेट्रोल- डिझेल खुलेआम विक्री सुरू आहे. जिल्हाधिकयांचे आदेश आम्ही कच्रयाच्या डब्यात टाकतो. असे तर हे पंप मालक सांगू इच्छित नाहीत ना ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
राज्य शासनाने 30 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. तर केंद्र सरकारने 3मे पर्यंत लॉक डाउन केले आहे. याच पार्श्वभूमीवर सर्व उपाय योजना सुरू आहेत, रस्त्यावर नजर टाकली तर अनेक छोटी मोठी वाहने अत्यावश्यक सेवा असा स्वतःचा फलक लावून फिरताना दिसत आहेत.त्यावर कुठेही प्रशासनाचा शिक्कामोर्तब नाही.अशा फलक लावलेल्या वाहनांना पोलीस विचारत नाहीत तर इंधन ही राजरोस दिले जात आहे.
अशा फलक असणारी वाहने विविध पेट्रोल पंपावर तेल भरून घेत आहेत,कोणत्या पंपावर किती तेल घेतले याचा काही पुरावा राहत नाही. त्यामुळे डिझेल व पेट्रोल चा मोठा काळाबाजार सुरू आहे. त्यामुळे अनेक रिकामे टेकडे लोक आशा वाहनाकडुन इंधनाची चढय़ा भावाने खरेदी करून हिंडताना दिसत आहेत. त्यामुळे या हुदडणाया लोकांना इंधन मिळत कुठून हा सर्वाना पडलेला प्रश्न आहे.
त्याच पार्श्वभूमीवर सातारा जिह्यात या अत्यावश्यक सेवेवर प्रशासनाची करडी नजर आवश्यक आहे. दूध गाडीतून नक्की दूध वाहतूक होते का कारण त्या दुध गाडीत 14 ते 15 कॅन मांडतात सर्व कॅन मध्ये दूध आहे का याची खात्री करणे गरजेचे झाले आहे.कारण काही ठिकाणी देशी दारूचा पुरवठा सुरू आहे तर काही ठिकाणी इंधन भरत असल्याची शंका अनेकांनी व्यक्त केली आहे. रात्रीच्या वेळी मोठे ट्रक पडदे बांधून व अत्यावश्यक सेवा असा फलक लावून वाहतूक सुरू आहे.त्यामधून नेमकी काय अत्यावश्यक सेवा आहे याची तपासणी होणे गरजेचे आहे. तसेच शासनाचे आदेश धाब्यावर बसवून पेट्रोल डिजेलची विक्री करणाया पंप चालकांना चाप लावणे गरजेचे आहे