प्रतिनिधी/ सातारा
संपूर्ण देशात कोरोनाच्या र्पाश्र्वभूमीवर विविध नियम लागू करण्यात आले आहेत. कोरोना विषाणूचा धोका टळावा याकरिता हे प्रशासनातर्फे हे नियम लागू करण्यात आले आहेत. तरी देखील कित्येक नागरिक या नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहेत.
काही नागरिकांना तर या परिस्थितीचे गांभीर्य अध्याप कळले नाही, असेच चित्र काहीसे पहावयास मिळाले.
पेन्शन दारांची पेन्शन जमा झाले हे निमित्त पुढे करून नागरिक घरातून बाहेर पडल्याचे दिसून येत होते. त्यामुळे रस्त्यावर नागरिकांची गर्दी पहावयास मिळत होती. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना पेट्रोल सध्या तरी देण्यात येणार नाही, असा नियम असताना देखील काही युवक पेट्रोलच्या बहाण्याने मात्र शहर परिसरात फेरफटका मारताना दिसत होते. यापैकी कित्येक नागरिकांनी मास्कचा वापर देखील केला नव्हता. तसेच सोशल डिस्टन्स चे उल्लंघन देखील करण्यात आल्याचे दिसत होते.
त्यामुळे पोलिस प्रशासनातर्फे मास्कचा वापर करा, सोशियल डिस्टन्स पाळा व नियमांचे उल्लंघन करू नका असे सांगण्यात येत होते. तरीही काही नागरिक या कडे कानाडोळा करून निघून गेल्याचे स्पष्टपणे दिसून येतं होते. कोरोना विषाणू चे महाभयंकर संकट सध्या जगावर आले आहे. याकरिता आपल्या देशातील प्रशासनातर्फे विविध नियम लागू करण्यात येत आहे. नागरिकांनी याचे नियमितपणे पालन केल्यास मात्र हा धोका होऊ शकतो. पण काही नागरिकांनी मात्र याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.