सिगन चषक टी-20 क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : माळमारूती स्पोर्ट्स क्लब आयोजित सिगन चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत सोमवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात लॉगर्स संघाने आनंद अकादमीवर 4 धावानी तर गोकाक क्रिकेट क्लबने अर्जुन स्पोर्ट्स संघावर 6 गडय़ांनी मात करून पुढील फेरीत प्रवेश केला. दर्शन वडगावी (लॉगर्स), शंकर डीके (गोकाक) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. युनियन जिमखाना मैदानावर झालेल्या पहिल्या सामन्यात लॉगर संघाने 20 षटकात 7 बाद 141 धावा केल्या. त्यात सलमान गोकाककरने 30, दर्शन वडगावीने 5 चौकारासह 35, मोहसीन मुल्लाने 31 धावा केल्या. आनंद अकादमीतर्फे ओमकारने 26 धावात 3, किरण कणबर्गीने 13 धावात 2 तर चेतनने 23 धावात 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल आनंद अकादमीने 20 षटकात 9 बाद 137 धावाच केल्या. त्यात रक्षित पाटीलने 38, राहुल नाईकने 27 धावा केल्या. लॉगरतर्फे दर्शन वडगावीने 17 धावात 2 गडी बाद केले. दुसऱया सामन्यात अर्जुन स्पोर्ट्सने 20 षटकात 9 बाद 78 धावा केल्या. त्यात रवी नेल्सनने 19 धावा केल्या. गोकाकतर्फे शंकरने 8 धावात 4 तर आनंदने 13 धावात 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना गोकाक क्रिकेट क्लबने 13.1 षटकात 4 बाद 79 धावा करून सामना 6 गडय़ांनी जिंकला. त्यात रवी दोपिण्णावरने 18, सर्फराजने 17, शंकरने 10 धावा केल्या.