सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेची मागणी ः पीडब्ल्यूडीच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन
प्रतिनिधी/कोल्हापूर
सार्वजनिक बांधकाम विभागाकडील (पीडब्ल्यूडी) नोंदणीकृत सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना रक्कम रु 10 लाख पर्यंतच्या एकूण कामापैकी 33 टक्के काम वाटप लॉटरी पद्धतीने देण्याबाबत राज्य शासनाचे आदेश आहेत. यातून पारदर्शक पद्धतीने कामांचे वाटप होऊन बेरोजगार अभियंत्यांच्या रोजगाराचा प्रश्न मिटावा हा शासनाचा मुख्य हेतू आहे. मात्र कोल्हापूर जिल्हÎाच्या पीडब्ल्यूडीमध्ये मात्र शासनाच्या आदेशाला हरताळ फासत अधिकाऱयांच्या मनाप्रमाणे कामांचे वाटप सुरू असल्याचा आक्षेप सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटनेने घेतला आहे. लॉटरी पद्धतीने जिल्हानिहाय पारदर्शीपणे कामांचे वाटप करण्यात यावे, अशी मागणीही या संघटनेने केली आहे.
या संदर्भात सोमवारी संघटनेच्या पदाधिकाऱयांनी पीडब्ल्यूडीचे कार्यकारी अभियंता एस. बी. काटकर यांची भेट घेऊन आपल्या व्यथा मांडल्या. या संदर्भात संघटनेतर्फे प्रसारमाध्यमांना दिलेली माहिती अशी ः कोल्हापूर जिह्यात पीडब्ल्यूडीच्या वतीने नोंदणीकृत सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना दर महिन्याच्या दुसऱया सोमवारी लॉटरी पद्धतीने काम वाटप होते. यासाठी शासनाच्या वेबसाईटवर 10 दिवस आधी सूचना दिली जाते. मात्र कोरोनाकाळात निधीच्या कमतरतेमुळे कोल्हापूर जिह्यात गेल्या दीड वर्षात केवळ 12 लोकांना 17.45 लाख रुपये किंमतीच्या कामांचे वाटप झाले आहे. परिणामी सुमारे 99 टक्के नोंदणीकृत अभियंता कामापासून वंचित आहेत. गेल्या महिन्यात 13 सप्टेंबर 2021 रोजी 21 कामांच्या वाटपासाठी www.mahapwd.com या संकेतस्थळावर यादी प्रसिद्ध झाली होती, मात्र प्रशासकीय कारणामुळे सदर कामे शेवटच्या क्षणाला रद्द करण्यात आली. या महिन्यात 11 ऑक्टोबर रोजी 10 कामांचे वाटप लॉटरी पद्धतीने होणार होते. सदरची सर्व कामे एकाच विधानसभा मतदारसंघातील होती. यासाठी जिह्यातील 64 नोंदणीकृत अभियंते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात उपस्थित होते. मात्र ऐनवेळी केवळ संबंधित तालुक्यातील अभियंत्यांनाच काम वाटप व्हावे, अशी भुमिका प्रशासनाने घेतली. मात्र या भूमिकेला जिह्यातील उपस्थित सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांनी विरोध केला. शासनाच्या आदेश, निर्देशानुसार लॉटरी पद्धतीने जिल्हा निहाय कामे द्या, ती देताना परदर्शीपणे द्या, अशी मागणी सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांच्या शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंता तथा प्रभारी अधीक्षक अभियंता एस. बी. काटकर यांच्याकडे केली. त्यांनी कामाबाबत दोन दिवसात बैठक घेऊन निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले.