वृत्तसंस्था/ लॉसेन
डब्ल्यूटीए टूरवरील रविवारी येथे झालेल्या लॉसेन खुल्या महिलांच्या आंतराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत टॉप सीडेड तमारा झिदान्सेकने फ्रान्सच्या ब्युरेलचा पराभव करत विजेतेपद पटकाविले.
रविवारी झालेल्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात झिदान्सेकने ब्युरेलचा 4-6, 7-6 (7-5), 6-1 असा पराभव केला. प्रेंच ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत झिदान्सेकने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती.