प्रतिनिधी/ बेळगाव
नैर्त्रुत्य रेल्वेने लोंढा येथे रेल्वे मार्गाच्या दुसऱया बाजुला राहणाऱया रहिवाशांसाठी रोड अंडरब्रिज तयार केला आहे. यामुळे दुसऱया बाजुला राहणाऱया 250 घरांना येण्या जाण्यास मार्ग खुला झाला आहे. नुकतेच या रोड अंडरब्रिजचे काम पूर्ण झाले असून, मंगळवारी नैर्त्रुत्य रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक अजयकुमार सिंग यांनी पाहणी केली.
मागील वर्षभरात अनेक ठिकाणी रेल्वे विभागातर्फे रोड ओव्हरब्रिज, रोड अंडरब्रिज व सबवे तयार केले आहेत. लोंढा येथे रेल्वेमार्गाच्या दुसऱया बाजुला राहणाऱया रहिवाशांकडून अंडरब्रिज बांधून देण्याची मागणी होत होती. रेल्वे विभागाच्या अधिकाऱयांनी या परिसराची पाहणी करून रोड अंडरब्रिज तयार करण्याची सहमती दर्शविली. एकूण 6.12 कोटी रुपये खर्चुन आरसीसी ब्लॉक जोडून हा ब्रिज तयार करण्यात आला आहे. यामुळे परिसरातील रहिवाशांना येणे-जाणे सहज शक्य होणार आहे. या मार्गाची अजयकुमार सिंग यांनी पाहणी करून रेल्वे विभागाच्या कामाचे कौतुक केले..