दुपदरीकरणाच्या कामाचा घेतला आढावा
प्रतिनिधी /बेळगाव
नैर्त्रुत्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) अरविंद मालखेडे यांनी मंगळवारी लेंढा-सुलधाळ रेल्वेमार्गाच्या कामाची पाहणी केली. रेल्वेमार्ग दुपदरीकरणाच्या कामाचा त्यांनी आढावा घेतला. बेळगाव, लोंढा, खानापूर रेल्वेस्थानकाला भेट देऊन तेथील परिस्थिती जाणून घेतली.
रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणासोबतच विद्युतीकरण करण्यात येत आहे. टप्प्याटप्प्याने हे काम पूर्ण केले जात आहे. सध्या गुंजी ते सुलधाळ या दरम्यान दुपदरीकरणाचे काम केले जात आहे. या कामाचा आढावा डीआरएम यांनी मंगळवारी घेतला. लोंढा, खानापूर व बेळगाव रेल्वेस्थानकाला त्यांनी भेट देऊन तेथील परिस्थिती जाणून घेतली. बेळगाव रेल्वेस्थानकाचे नुतनीकरण करण्यात येत असल्याने त्याचाही त्यांनी आढावा घेतला. रेल्वेस्थानकापासून कपिलेश्वर उड्डाणपुलापर्यंतच्या रेल्वेमार्गाची पायी चालत पाहणी केली. रेल्वे ट्रक बसविण्याचे काम होणार असल्याने पाहणी केली. यानंतर बेळगाव ते सुलधाळ रेल्वेमार्गाचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत रेल्वेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.