प्रतिनिधी / सातारा
लोककला व पथनाट्य सादर करणाऱ्या संस्थांची निवडसुची 20 डिसेंबर रोजी संपुष्टात आली आहे. याबाबत नवीन निवडसूची तयार करण्यात येणार असून जिल्ह्यातील लोककला व पथनाट्य सादरकरणाऱ्या संस्थांनी निवडसुचीसाठी जिल्हा माहिती कार्यालय, सातारा येथे 21 जानेवारीपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी केले आहे.
निवडसुचीचे अर्ज dgipr.maharashtra.gov.in व www.maharashtra.gov.in या संकेतस्थळाबरोबरच जिल्हा माहिती कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत 3 रा मजला, सातारा येथे उपलब्ध आहेत. तरी इच्छुक संस्थांनी निवडसुचीसाठीचे अर्ज 21 जानेवारी 2021 पर्यंत सादर करावेत, असेही आवाहन जिल्हा माहिती अधिकारी श्री. पाटील यांनी केले आहे.