प्रतिनिधी /बेळगाव
लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेली लोककल्प फौंडेशन संस्था बेळगाव यांच्यातर्फे हेल्पर्स ऑफ द हॅण्डीकॅप कोल्हापूर या संस्थेस धान्य व जीवनावश्यक वस्तू प्रदान करण्यात आल्या. लोककल्प ही संस्था सामाजिक बांधिलकी जपून समाजातील विविध गरजू घटकांना निरनिराळय़ा माध्यमातून मदतकार्य करत असते. संस्थेने बेळगाव जिल्हय़ातील खानापूर तालुक्मयातील 32 गावे दत्तक घेऊन तेथील लोकांचे राहणीमान सुधारण्यासाठी प्रयत्न केला आहे. त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास मदत करून आत्मनिर्भर केले जाते. दत्तक गावातील नागरिकांना त्यांनी बनविलेल्या वस्तूंची विक्री करण्यासाठी कणकुंबी येथे दालन उपलब्ध करून दिले आहे.
जंगलातील मध गोळा करण्यासाठी पेटय़ा पुरविल्या जातात. विद्यार्थांना शाळेमध्ये संगणक व स्कूल कीट प्रदान केले आहेत. कोल्हापूर शहरातील शारीरिकदृष्टय़ा कमकुवत असणारे लोक हेल्पर्स ऑफ द हॅण्डीकॅप या संस्थेमध्ये आहेत. त्यांना जीवनावश्यक वस्तू व धान्य भेट देवून लोकमान्य व लोककल्प संस्थेने सामाजिक बांधिलकी जपली आहे. याप्रसंगी लोकमान्य सोसायटी व लोककल्प संस्थेचे ज्ये÷ संचालक अजित गरगट्टी यांनी पुढाकार घेवून धान्य वाटपास मदत केली. या कार्यकमामध्ये लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटीचे क्षेत्रिय व्यवस्थापक दिलीप पाटील व लोककल्प संस्थेच्या व्यवस्थापिका मालीनी बाली, हेल्पर्स ऑफ द हॅण्डीकॅप या संस्थेच्या वनीता अपराध व तानाजी देसाई उपस्थित होते.