बेटणे गावात रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याऱया औषधांचे वितरण
@ बेळगाव / प्रतिनिधी
लोकमान्य सोसायटी संचालित लोककल्प फौंडेशनच्या माध्यमातून खानापूर तालुक्मयातील दुर्गम गावांमध्ये कोरोनाबाबत जागृती केली जात आहे. आजही तेथील गावांमध्ये अनेक कोरोनाबाबत गैरसमज आहेत. त्यामुळे योग्य उपचार घेतले जात नसल्याने लोककल्प फौंडेशनचे सदस्य त्यांना मार्गदर्शन करीत आहेत. कणकुंबी जवळच्या बेटणे गावांमध्ये जावून तेथील नागरिकांना रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याऱया औषधांचे वितरण करण्यात आले.
फौंडेशनचे सदस्य किरण गावडे यांच्या हस्ते बेटणे गावातील ग्रामस्थांना औषधांचे वितरण करण्यात आले. जागृती करताना ते म्हणाले, ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण आता वाढत आहेत. नागरिकांना योग्य माहिती नसल्याने त्यांच्याकडून दुर्लक्ष होत असल्याने आजार बळावत आहे. दोन दिवसांच्यावर ताप असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तसेच कोणतीही अडचण निर्माण झाल्यास लोककल्प फौंडेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले.
गजानन बाडीवाले यांनी रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याऱया औषधाचे महत्त्व ग्रामस्थांना पटवून दिले. यावेळी किरण बडवाण्णाचे, गजानन बाडीवाले, श्रीकांत माने, गजानन पाटील, संजय वरंडेकर यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.