प्रतिनिधी /बेळगाव
लोकमान्य सोसायटीच्या लोककल्प फौंडेशनच्या वतीने खानापूर तालुक्मयातील कणकुंबी जवळील बेटणे या गावामध्ये नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. डॉ. तेजस्वी तिर्थहळ्ळी व डॉ. श्रीनिवास मूर्ती यांच्या सहकार्याने हे शिबीर घेण्यात आले.
नेत्र तपासणी करून त्यांना चष्मा व इतर औषधोपचार मोफत देण्यात आले. परिसरातील नागरिकांनी तज्ञांकडून नेत्र तपासणी करून घेतली. यावेळी परिसरातील नागरीक उपस्थित होते.