प्रतिनिधी /बेळगाव
यंदाच्या हिवाळय़ात थंडीची तीव्रता अधिक असून सर्वांनाच या थंडीचा तडाखा बसत आहे. दिवसेंदिवस थंडी वाढतच आहे. या अनुषंगाने लोकमान्य सोसायटी व लोककल्प फौंडेशनच्यावतीने कापोली या दत्तक खेडय़ात 290 ब्लँकेट्सचे वाटप करण्यात आले.
कणकुंबी भागातील अनेक खेडी प्राथमिक सुविधांपासून वंचित आहेत. काही खेडय़ात जाण्यासाठी रस्तेही नाहीत. दाट जंगलात ही खेडी वसलेली आहेत. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी व लोककल्प फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली लोककल्प फौंडेशन बेळगावच्यावतीने ब्लँकेट्सचे वाटप कार्यक्रम झाला. लोककल्प फौंडेशनचे संचालक किरण गावडे यांच्या हस्ते ब्लँकेट्चे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश पारवाडकर, सहदेव गावडे व लोककल्प स्वयंसेवक अनंत गावडे, सुहासिनी पेडणेकर, संतोष कदम, लोकमान्य सोसायटीचे निखील अर्जुनवाडकर, ओंकार ढेगस्कर, प्रसाद तवनोजीचे आदी उपस्थित होते. गावकऱयांनी लोककल्पच्या या कार्याची प्रशंसा करून आभार मानले.