प्रतिनिधी /बेळगाव
संस्थापक अध्यक्ष मा. किरण ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेली लोककल्प फौंडेशन संस्था बेळगाव यांच्यातर्फे मातोश्री वृद्धाश्रम कोल्हापूर या संस्थेस धान्य व जीवनावश्यक वस्तू प्रदान करण्यात आल्या. लोककल्प ही संस्था सामाजिक बांधीलकी जपून समाजातील विविध गरजू घटकांना निरनिराळय़ा माध्यमातून मदतकार्य करत असते. संस्थेने बेळगाव जिह्यातील खानापूर तालुक्मयातील कणकुंबी व जांबोटी भागातील 32 गावे दत्तक घेऊन तेथील लोकांचे राहणीमान सुधारण्यासाठी प्रयत्न केला आहे. त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास मदत करून आत्मनिर्भर केले जाते. अर्थार्जनाचे साधन निर्माण करून जीवन जगण्याची कला येथे शिकवली जाते.
जंगलातील मध गोळा करण्यासाठी पेटय़ा पुरवल्या जातात. तेथील लोकांच्या कुटीर उद्योगातून वस्तू तयार करून घेतल्या जातात व त्यांच्या विक्रीची व्यवस्था चोर्ला घाटातील विक्री केंद्रातून केली जाते. विद्यार्थांना शाळेमध्ये संगणक व स्कुल कीट प्रदान केले आहेत. कोल्हापूर शहरातील मातोश्री वृद्धाश्रम या संस्थेमध्ये जीवनावश्यक वस्तू व धान्य भेट देऊन या संस्थेने सामाजिक बांधीलकी जपली आहे. याप्रसंगी लोकमान्य व लोककल्प संस्थेचे ज्ये÷ संचालक अजित गरगट्टी यांनी पुढाकार घेऊन धान्यवाटपास मदत केली. तसेच या कार्यक्रमामध्ये लोकमान्यचे क्षेत्रिय व्यवस्थापक दिलीप पाटील व लोककल्प फौन्डेशनच्या व्यवस्थापिका मालीनी बाली उपस्थित होते. तसेच मातोश्री वृद्धाश्रम या संस्थेच्या अध्यक्षा वैशाली राजशेखर भुतकर, उपाध्यक्षा सुर्यप्रभा चिटणीस व सचिव पूजा पाटील उपस्थित होत्या.