ऑनलाईन टीम / पुणे :
लोकनेते दयाराम राजगुरु यांच्या 75 व्या जयंतीनिमित्त कोरोना महामारीत ढोले-पाटील परिसरातील झोपडपट्टीत ‘कोरोना वाॅरीयर्स’ म्हणून योगदान दिलेले सफाई कामगार, महानगरपालिकेच्या ढोले-पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकारी तसेच विशेष पोलीस अधिकारी अर्थात एस.पी.ओ.यांचा नगरसेविका लता राजगुरु यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि सॅनिटायझरेच किट देऊन सन्मान करण्यात आला.
लोकनेते दयाराम राजगुरु चॅरीटेबल ट्रस्टतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर लोकनेते दयाराम राजगुरु चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डाॅ. यशवंत रणशेवरे, डाॅ. प्रकाश वनावळे, सचिन सावंत, दयानंद तानपडे, विमल वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.
कोरोना महामारिच्या काळात सर्वांनीच एकसंघ भावनेने काम करणे आवश्यक आहे. तरच आपण या महामारीच्या संकटावर मात करु शकु. ढोले-पाटील रोड हा कोरोनाच्या विळख्यात अडकला होता. या क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणारे भागात याचा प्रार्दूभाव अधिक होता. पंरतू केवळ सर्वांच्या एकत्रीत प्रयत्नांनी आपण आता रेड झोन मधून ऑरेंज झोनमध्ये प्रविष्ठ झालो आहोत आणि येत्या काळात लवकरच ग्रीन झोन मध्ये प्रवेश करु, याबाबत मला विश्वास आहे.