ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
लोकपाल सदस्य, माजी न्यायाधीश ए. के. त्रिपाठी यांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे त्यांचे निधन झाले आहे. ते 62 वर्षांचे होते.
मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना 2 एप्रिल रोजी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र शनिवारी रात्री 8.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
त्रिपाठी यांना त्यांच्या मुलीमुळे कोरोनाची लागण झाली होती. लंडन मधून परतलेल्या त्यांच्या मुलीला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तिला ट्रामा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते.
ते छत्तीसगड येथील उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती होते. त्यांच्या निधनाची बातमी मिळताच सोशल मीडिया वरून त्यांना अनेकांनी श्रद्धांजली वाहिली आहे.