प्रतिनिधी / बेळगाव
सुयोग्य कालावधीत आकर्षक व्याज परतावा देणारी गुंतवणूक योजना म्हणून लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडची ‘आनंदी जीवन’ ही योजना गुंतवणूकदारांच्या पसंतीस उतरली आहे. या योजनेस ग्राहक, सभासद, गुंतवणूकदारांचा लक्षणीय प्रतिसाद मिळत आहे.
या योजनेत ग्राहक, सभासद, गुंतवणूकदारांना केवळ 18 महिन्यांच्या गुंतवणुकीवर सुमारे 9 टक्के व्याजदराने परतावा मिळणार आहे. ज्यामध्ये किमान गुंतवणूक रक्कम फक्त रु. 10 हजार रुपये आहे. तर या योजनेत ज्ये÷ नागरिकांसाठी 0.5 टक्के अधिकचे व्याज मिळणार आहे. या योजनेतून मिळणारा परतावा पाहता तो आजच्या आर्थिक परिस्थितीत सर्वोत्तम व सर्वाधिक असा आहे.
कोरोना कालावधीत अर्थव्यवस्थेने अनेक चढउतार अनुभवले आहेत. त्या पार्श्वभूमीवर उपलब्ध गुंतवणूक योजनांच्या तुलनेत ही योजना सर्वोत्तम व सुरक्षित असा परतावा देणारी आहे. कमी कालावधीत चांगला परतावा देणारी ही गुंतवणूक योजना ठरणार आहे.
विशेष म्हणजे ‘ऑनलाईन डिजिटल प्लॅटफॉम’च्या माध्यमातून (www.त्दक्स्aहब्aदहत्ग्हा.म्दस्/dाज्देग्t) सभासद, ग्राहकांना घरबसल्या या योजनांमध्ये पैसे गुंतविता येणार आहेत. कोरोनाकाळात गुंतवणूकदारांचा विचार करून केलेल्या गुंतवणुकीवर आकर्षक असा हमखास परतावा ग्राहकांना मिळावा, या उद्देशाने सोसायटीने ही योजना सादर केली आहे.
‘लोकमान्य सोसायटी’च्या कोणत्याही शाखेत संपर्क साधून ग्राहक, सभासद, गुंतवणूकदारांना या योजनेचा लाभ घेता येईल, असे आवाहन लोकमान्य सोसायटीतर्फे करण्यात आले आहे.