प्रतिनिधी/ बेळगाव
लोकमान्य सोसायटीच्यावतीने दि. 8 फेब्रुवारी रोजी महिलांसाठी मराठा मंदिर येथे ‘उन्नती एक पाऊल प्रगतीकडे’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गतवषीच्या उन्नती महोत्सवाला मिळालेला महिलांचा लक्षणीय प्रतिसाद घेऊन त्यांच्याच आग्रहास्तव यंदा अधिक विस्तारित सभागृहात हा महोत्सव होत आहे.
नामवंत वक्त्यांचे गुंतवणूक आणि बचत या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान, त्यानंतर महिलांसाठी विविध स्पर्धा, फनी गेम्स तसेच उन्नती गृहलक्ष्मी अंतर्गत विविध प्रश्नावली आणि सेलिब्रेटींच्या हस्ते बक्षीस वितरण हे या महोत्सवाचे खास आकर्षण आहे.
लोकमान्य सोसायटीचे यंदाचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. यानिमित्ताने सोसायटीच्या विभागीय कार्यालयातही उन्नती महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. उत्कृष्ट विचार मंथन, बक्षिसांची लयलूट आणि मनोरंजन यामुळे महिलांमध्ये लोकमान्य उन्नतीचे आकर्षण महत्त्वाचे ठरले आहे. गतवषी या महोत्सवाला महिलांनी लक्षणीय प्रतिसाद दिला होता.
त्यांच्याच आग्रहास्तव दि. 8 फेब्रुवारी रोजी उन्नती महोत्सव होत आहे. दुपारी 3 वाजल्यापासून कार्यक्रमाला प्रारंभ होणार आहे. स्पर्धांचे स्वरुप आणि गर्दी लक्षात घेऊन महिलांनी वेळेवर आसनस्थ व्हावे व आपली निराशा टाळावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.