बेळगाव /प्रतिनिधी :
गणेशोत्सवाच्या निमित्ताने लोकमान्य को-ऑपरेटिव्ह सोसायटीने आपले ग्राहक आणि तमाम भक्तांसाठी विविध आरत्यांचा समावेश असणारे ऍप सुरू केले आहे. कोरोना संदर्भातील नियमांचे पालन व्हावे, या उद्देशाने सोसायटीने हे डिजिटल ऍप भक्तांच्या सेवेत रुजू केले आहे.
लोकमान्य सोसायटीला येत्या 31 ऑगस्ट रोजी 25 वर्षे पूर्ण होत आहेत. पंचवीस वर्षाच्या वाटचालीत सोसायटीने ग्राहकांच्या आणि सभासदांच्या गरजा ओळखून त्यांना आर्थिक पाठिंबा दिला आहे. या सोसायटीमुळे अनेक व्यवसाय आणि उद्योग सुरू झाले आहेत. लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष आणि तरुण भारत समूहाचे सल्लागार संपादक किरण ठाकुर यांच्या संकल्पनेतून भक्तांसाठी हे आरती संग्रहाचे डिजिटल ऍप तयार करण्यात आले आहे.
या ऍपमध्ये श्रीगणपती, श्रीशंकर, देवीची आरती, श्रीविठ्ठल, श्रीदत्त, श्रीकृष्ण, श्रीसत्यनारायण, श्रीमंगेशी, श्री गणराय आदी आरती आहेत. याशिवाय संकटनाशक गणेशस्तोत्र, गणपती अथर्वशीर्ष, देवीचा जोगवा यांचाही समावेश आहे. लोकमान्यचे ग्राहक आणि भक्तांना bit.ly/Aartiapp या लिंकवर या आरत्यांचा लाभ घेता येणार आहे.