कोविड काळात आरोग्य विमा संरक्षणही मिळणार
प्रतिनिधी / बेळगाव
लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी आरोग्य विमा संरक्षणासह (कोविड-19 सहित) लोकमान्य सुरक्षा समृद्धी ठेव योजना सुरू करत आहे. या योजनेत सुरक्षा समृद्धी व सुरक्षा समृद्धी अŸडवांटेज या दोन प्रकारांचा समावेश आहे. ही मुदत ठेव योजना 1 वर्षाची असून 8.50 टक्के व्याज दराने उपलब्ध आहे.
या योजनेत गुंतवणूकदारांना आरोग्य विमा संरक्षणासह (कोविड-19 सहित) 1 लाखापर्यंत विमा संरक्षण मिळते. ग्राहकांना सदर योजनेत कमीतकमी एक रकमी 2 लाख किंवा 1 हजाराच्या पटीत गुंतवणूक करावी लागेल. या योजनेत जास्तीत जास्त गुंतवणुकीवर मर्यादा नाही. 2 लाखाच्या गुंतवणुकीवर 1 लाख आरोग्य विमा संरक्षणासह (कोविड-19 सहित) प्रतिदिन असा 50 दिवसांपर्यंत दररोज 2000 रुपयेपर्यंत इस्पितळ खर्च मिळतो.
तसेच 2.50 लाख किंवा जास्त गुंतवणुकीवर सभासद लोकमान्य सुरक्षा समृद्धी ठेव अŸडवांटेज प्लॅनमध्ये सहभागी होऊ शकतात. यात 1 लाख आरोग्य विमा संरक्षणासह (कोविड 19 सहित) 25 दिवसांपर्यंत दररोज 4000 रुपयेपर्यंत इस्पितळ खर्च मिळतो. एकापेक्षा अधिक व्यक्तींच्या नावे मुदतठेव ठेवल्यास ठेवीच्या वेळी ठेवीदाराकडून प्रथम धारकाच्या नावाने पॉलिसी जारी केली जाईल.
या योजनेत 18 ते 65 वयोगटातील सभासद सहभागी होऊ शकतात. ही योजना 3 मे ते 31 जुलै 2021 या कालावधीतच कार्यान्वित राहील. ही योजना लोकमान्य सोसायटी व आयसीआयसीआय लोंबार्ड यांच्यामधील संयुक्त करार विद्यमाने अंमलात आली असून पॉलिसी सेटलमेंट आयसीआयसीआय लोंबार्ड नियमांच्या अखत्यारित असेल. सद्यस्थिती अभ्यासून सोसायटीने ही योजना ग्राहकांच्या सेवेसाठी आणली असून सभासदांनी योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन सोसायटीतर्फे करण्यात आले आहे. ग्राहकांनी आपल्या नजीकच्या लोकमान्य सोसायटीच्या शाखेत संपर्क साधावा, असे कळविले आहे.