प्रतिनिधी / बेळगाव
लोकमान्य को-ऑप. सोसायटीच्या सामाजिक उपक्रमांतर्गत शुक्रवारी कणबर्गी येथील महेश फौंडेशनला भेट देऊन ब्लँकेट वाटप करण्यात आले. बेळगाव विभागीय व्यवस्थापक मधुकर कुलकर्णी यांच्या हस्ते महेश फौंडेशनचे अध्यक्ष महेश जाधव यांचा सत्कार करण्यात आला.
लोकमान्य सोसायटी आर्थिक क्षेत्रासोबतच सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करीत आहे. त्यामुळे सामाजिक काम करणाऱया संस्थांना आर्थिक तसेच साहित्याची मदत करण्यात येत आहे. महेश फौंडेशनला 35 ब्लँकेट, अल्पोपाहार व विद्यार्थ्यांना चॉकलेट वितरण करण्यात आले.
यावेळी लिगल व्यवस्थापक विश्वनाथ जोशी, मार्केटिंग मॅनेजर गुरुप्रसाद तंगाणकर, माळमारुती शाखेच्या व्यवस्थापक अमृता शेडबाळकर उपस्थित होते. साहाय्यक विभागीय व्यवस्थापक चंद्रशेखर पाटील यांनी आभार मानले. यावेळी लोकमान्य परिवारातील सदस्य उपस्थित होते.