प्रतिनिधी /काणकोण
चावडी, काणकोण येथील राज एंटरप्राईझेसच्या रश्मी राज कामत यांचा काणकोणच्या लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीतर्फे गौरव करण्यात आला. काणकोणच्या ‘लोकमान्य’ शाखेचे व्यवस्थापक महेंद्र नाईक, साहाय्यक व्यवस्थापिका अनुपा प्रभू, आर. बी. एस. कोमरपंत, अकाउन्ट साहाय्यक सोनाली केंकरे, रूपाली नाईक, सेल्स एक्झिक्युटिव्ह संचित प्रभू आणि लक्ष्मण वैज यावेळी उपस्थित होते. रश्मी कामत या चावडीवर मागच्या कित्येक वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक आणि घरगुती वापराच्या वस्तूंचा व्यवहार करत आलेल्या असून आपल्या पतीच्या निधनानंतर 1995 पासून स्वतंत्रपणे त्या आपला व्यवहार सांभाळत आल्या आहेत. सध्या त्यांच्याकडे 4 कर्मचारी असून आपला व्यवसाय अधिक विस्तृत करण्याचा त्यांचा विचार आहे.