प्रतिनिधी /बेळगाव :
लोकमान्य ग्रंथालयामध्ये गुरूवार दि. 23 रोजी सायंकाळी लोकमान्य जयंती साजरी करण्यात आली. अनगोळ महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रतिभा आपटे यांच्या हस्ते लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. लॉकडाऊनचे सर्व नियम पाळत हा कार्यक्रम झाला.
प्रतिभा आपटे यांनी टिळकांच्या देशकार्याचे स्मरण करून त्यांच्यावर कविता सादर केली. क्रांतीकारक चंद्रशेखर आजाद यांचेही त्यांच्या जयंती निमित्त स्मरण करण्यात आले. याप्रसंगी किशोर काकडे, उज्वला काकडे, ग्रंथपाल रंजना व कर्मचारी उपस्थित होते.