गणेशचतुर्थीच्या शुभमुहूर्तावर कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त फायदा मिळवून देणारी योजना
प्रतिनिधी /बेळगाव
लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीतर्फे खास गणेशचतुर्थीच्या शुभमुहूर्तावर लोकमान्य दुर्वांकुर ही अल्पमुदत ठेव योजना सुरू करण्यात आली आहे. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त फायदा मिळवून देणारी ही योजना दि. 10 सप्टेंबरपासून ग्राहकांच्या सेवेत रुजू होणार आहे. 11 महिन्यांच्या अल्पमुदत गुंतवणुकीवर 8.50 टक्के असा आकर्षक व्याजदर ग्राहकांना मिळणार आहे.
या योजनेत सहभागी होण्यासाठी कमीत कमी रुपये 10 हजार किंवा त्या पटीत कितीही रक्कम गुंतवता येते. रुपये 10 लाख किंवा अधिक गुंतवणुकीवर 0.50 टक्के अधिक व्याज मिळेल. या योजनेत मुदतपूर्व ठेव रक्कम काढण्याची मुभाही आहे. गुंतवणुकीवर 90 टक्केपर्यंत कर्जसुविधा सोय उपलब्ध आहे.
सहकार क्षेत्रातील अग्रगण्य संस्था म्हणून लोकमान्य सोसायटीने यापूर्वीच लोकमान्यता मिळविली असून आकर्षक व्याज परतावा देणारी संस्था म्हणून नावारुपास आली आहे. ही योजना 10 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर दरम्यान कार्यान्वित असून सर्व सभासदांनी योजनेत भाग घ्यावा, असे लोकमान्य सोसायटीतर्फे कळविण्यात आले आहे. लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीच्या 213 शाखांचे विस्तीर्ण जाळे कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा व दिल्ली येथे पसरले असून सर्व कर्मचारीवर्ग ग्राहकांना नम्र सेवा देत असतात.