प्रतिनिधी/ सावंतवाडी:-
५ जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. याचे औचित्य साधून लोकमान्य मल्टिपर्पज को ऑपरेटिव्ह सोसायटीतर्फे नरेंद्र डोंगरावर वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सायली मराठे यांनी केले.
वनांचे महत्व किती आहे हे आत्ताच्या कोरोना काळात सर्व जगाला समजले आहे. प्रत्येक झाड हे काॅन्सट्रेटर आहे. प्रत्येकाने दरवर्षी एकतरी झाड लावावे, वटपौर्णिमेला महिलांनी वडाच्या फांद्या न तोडता वडापाशी जाऊनच पूजा करावी आणि एक-एक वृक्ष लावावा असे विचार लोकमान्यचे क्षेत्रीय व्यवस्थापक आनंद सामंत यांनी व्यक्त केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक सुरेंद्र बांदेकर यांनी उपस्थिती दर्शवली होती.
यावेळी वनविभागातर्फे वनपाल प्रमोद सावंत, नरेंद्र उद्यान वनपाल सदानंद कदम, वनरक्षक मळगांव प्रकाश रानगिरे, वनरक्षक वैशाली वाघमारे, अशोक गावडे वनमजूर यांनी वृक्षारोपणासाठी मदत आणि मार्गदर्शन केले. लोकमान्य मल्टिपर्पज तर्फे क्षेत्रीय व्यवस्थापक आनंद सामंत, मुरारी वालकर, शशांक विचारे, अरविंद परब, सुशांत पवार, सुषमा सामंत, सायली मराठे, जानू पाटील, अर्चना सरनाईक, श्रुती राऊळ, लखन पाटील, रजत देसाई, सूर्यकांत गावडे आदींनी वृक्षारोपण केले.