वेंगुर्ले/वार्ताहर-
गेल्या दोन वर्षाच्या कोरोना काळात सरकारी आरोग्य यंत्रणेबरोबरच महाराष्ट्र पोलीस यंत्रणेनेही चांगल्या दर्जाचे काम केलेले आहे. या खडतर कालावधीत वेंगुर्ले तालुक्यातील सुव्यवस्था व शांतता पोलीस स्थानकांतील पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने यशस्वीपणे राबविणारे वेंगुर्ले पोलीस निरीक्षक तानाजी मोरे यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल लोकमान्य पल्टीपर्पज कोपऑरेटीव्ह सोसायटीच्या वेंगुर्ले शाखेतर्फे शाखा व्यवस्थापक पुरूषोत्तम राऊळ यांनी सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.
लोकमान्य मल्टीपर्पज कोपरेटीव्ह हि संस्था समाजात नेहमी चांगले काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती यांचा सत्कार करून चांगले काम करणाऱ्यांना प्रोत्साहन देते. ज्या समाजात व भागात संस्था व्यवसाय करते, त्याभागीतल समाजाप्रती कांहीतरी करण्यासाठी नेहमीच कार्यरत असते. वेंगुर्ले तालुक्यात कोरोना रोखण्यासाठी मास्कचा वापर करण्यासाठी, विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तीपासून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, अनाठायी गर्दी होण्यापासून नागरीकांना परावृत्त करण्यासाठी तसेच या कारवाईत होणारा त्रास सहन करीत नागरीकांच्या हितासाठी काम करणाऱ्या वेंगुर्ले पोलीसांना गौरव करण्याचा कार्यक्रम आज शनिवारी वेंगुर्ले पोलीस स्थानकाचा गौरव पोलीस निरीक्षक तानाजी मोरे यांच्याकडे सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देवून करण्यांत आला.
यावेळी पोलीस निरीक्षक तानाजी मोरे यांनी चांगले काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा गौरव करून त्यांना प्रोत्साहन देणाऱया लोकमान्य मल्टीपर्पज कोपऑपरेटीव्ह संस्थेचे व शाखा व्यवस्थापकांचे आभार मानले.
यावेळी उपस्थितात लोकमान्यचे शाखा व्यवस्थापक पुरूषोत्तम राऊळ, कर्मचारी चक्रपाणी गवंडी, सोनू कांबळी, वेंगुर्ले तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप सावंत, पोलीस उपनिरीक्षक सौ. रूपाली गोरड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सचिन सावंत, हेडकाँन्स्टेबल सौ. रूपा पाटील, सौ. पुजा पालयेकर, प्रज्ञा पालकर, सुरज रेडकर यांचा समावेश होता.