प्रतिनिधी / सांगली
संस्थापक अध्यक्ष श्री. किरण ठाकुर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे वाटचाल करीत असलेली लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी विश्रामबाग शाखा आणि सेवा सदन लाईफ लाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी विश्रामबाग येथील खरे सांस्कृतिक भवन येथे आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला.
जयसिंगपूर चे उद्योजक प्रकाश झेले यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन झाले. याप्रसंगी तरुण भारतचे संपादक मंगेश मंत्री, लोकमान्यचे विभागीय व्यवस्थापक सुदत्त पाठक, डॉ. मधुरा किल्लेदार, मोहन जंगम, ॲड. कुबेर शेडबाळे, रमाकांत घोडके, अशोकराव पाटील कोकळेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. लोकमान्य विश्रामबाग शाखाधिकारी पंडितराव पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी लोकमान्यचे सहाय्यक विभागीय व्यवस्थापक प्रदीप पाटील, शाखाधिकारी सुभाष मोरे, अजित शिरगुप्पे, बी. एम. गांधी, बी. एम्. कोन्नूर, मार्केटिंग मॅनेजर अमित महामुनी हेही यावेळी उपस्थित होते.शिबिरात ह्रदय विकार, मेंदूविकार, मधुमेह, नेत्ररोग आदींची तपासणी करण्यात आली.