प्रतिनिधी /मडगाव
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटीने खास महिलांसाठी महिला सन्मान डिपोझिट स्कीम सुरू करण्यात आली आहे. या स्कीमचे उद्घाटन काल रविवारी लोकमान्य सोसायटचीचे संस्थापक अध्यक्ष तथा तरूण भारत चे समुह प्रमुख व सल्लागार किरण ठाकुर यांच्या हस्ते करण्यात आले.
काल रविवारी सकाळच्या सत्रात लोकमान्य सोसायटीच्या कोलवा शाखेत ग्राहक मेळावा झाला तर संध्याकाळच्या सत्रात दक्षिण गोवा विभागीय कार्यालयात ग्राहक मेळावा झाला. या मेळाव्याचे औचित्य साधून लोकमान्य महिला सन्मान डिपोझिट स्कीमचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी लोकमान्य सोसायटची संचालक गजानन धामणेकर, दक्षिण गोवा विभागीय व्यवस्थापक सुहास खांडेपारकर व मडगाव शाखा व्यवस्थापक श्रीमती सिंथीया उपस्थित होते.
महिला सन्मान डिपोझिट स्कीम 7 ते 31 मार्च पर्यंत चालणार असून या स्कीम अंतर्गत महिलांना कमीत कमी 1 लाख रूपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. त्यावर 8.60 टक्के व्याज दिली जाईल तसेच 3 हजार रूपयांची आरोग्य तपासणी मोफत असेल. या स्कीमचा कालावधी 400 दिवसांचा आहे. महिलांसाठी ही स्कीम खुपच उपयुक्त ठरणारी असून स्कीमच्या अधिक माहितीसाठी ग्राहकांनी आपल्या जवळच्या लोकमान्य शाखेत आवर्जुन भेट द्यावी असे आवाहन शाखा व्यवस्थापक श्रीमती सिंथीया यांनी या प्रसंगी बोलताना केले.
कोविडमुळे गेली दोन वर्षे सर्वच उद्योगावर मोठे परिणाम झाले. त्याचा परिणाम बँकिंग क्षेत्रावर सुद्धा झाला. सर्वच व्यवहार जवळपास ठप्प झाल्याने लोकांच्या हातात पैसा खेळतच नव्हता. शेतात उत्पादन झाल तरी पैसा येईना तशीच परिस्थिती इंडस्ट्रीजची होती. उत्पादन झाले तरी पैसा येत नव्हता. त्यामुळे पैशाच चलन थांबल होतं. सर्वच जण घाबरून गेले होते. त्याही अवस्थेत आपल्या कर्मचाऱयांनी सेवा दिली. कोविडच्या काळात बँका सुरू केल्या परंतु, सोसायटय़ाबद्दल काहीच निर्णय घेतला नाही. नंतर सरकारकडे हा विषय नेऊन सोसायटय़ा पुन्हा सुरू करण्यात आल्या. तेव्हा कर्मचाऱयांनी लोकांच्या घरी जाऊन सेवा दिली. दै. तरूण भारतच्या कर्मचाऱयांनी देखील जोखीम पत्करून वृत्त पत्राचे कामकाज चालू ठेवले असे किरण ठाकुर यावेळी म्हणाले.
आत्ता आपण कोविड महामारीतून बाहेर पडत आहोत, त्यामुळे एकमेकांशी संवाद साधू शकतो. तसेच आत्ता कार्यक्रमाचे नियोजन देखील केले जाईल. लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीने आज बँकिंग क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केली आहे. दक्षिण गोव्यातील ठेवी 565 कोटींच्या पुढे आहे. लोकमान्य सोसायटी आज रियल इस्टेट, हॉटेल व्यवसाय, शिक्षण, हॉस्पिटल, सोलर एनर्जी इत्यादीमध्ये गुंतवणूक करू शकते व त्यासाठी आवश्यक परवानगी घेण्यात आल्याची माहिती श्री. ठाकुर यांनी दिली.
विमुद्रीकरणामुळे पुण्यातील कंन्स्ट्रक्शन कंपन्यां अडचणीत आल्या होत्या. त्यांना लोकमान्य सोसायटीने कर्ज उलपब्ध करून देताना सावरण्याची संधी दिली. या कंपन्यांनी शेकडो कामगार काम करतात, त्यांनाही अप्रत्यक्षरित्या मदत झालेली आहे. सर्व सामान्याचे राहणीमान उंचावण्यासाठी लोकमान्य सोसायटी कार्यरत आहे. आज कणकुंबीला काही गावे दत्तक घेण्यात आलेली आहेत. त्या ठिकाणी त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली असल्याचे सांगण्यात आले.