प्रवेश प्रक्रिया सुरू : युवकांचा उत्तम प्रतिसाद : प्रशिक्षणार्थींसाठी उत्तम सोय
प्रतिनिधी/ बेळगाव
सध्याच्या युवापिढीमध्ये क्षमता असूनही योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने सैन्य दलात भरती होताना समस्या येत आहेत. अशा तरुणांना योग्य मार्गदर्शन देण्याचे काम लोकमान्य मिलिटरी टेनिंग अकॅडमी मागील अनेक वर्षांपासून करीत आहे. लॉकडाऊननंतर पुन्हा एकदा टेनिंग अकॅडमीतर्फे नव्या प्रशिक्षण बॅचची तयारी करण्यात येत आहे. नव्या बॅचच्या प्रवेशासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून युवकांचा उत्तम प्रतिसाद मिळू लागला आहे.
लोकमान्य मिलिटरी टेनिंग अकॅडमीने आजवर अनेक युवकांना देशसेवेच्या रक्षणासाठी तयार केले आहे. त्यातील अनेकजण लष्करी व निमलष्करी दलांमध्ये मोठय़ा हुद्दय़ांवर कार्यरत आहेत. प्रशिक्षणार्थींना शारीरिक कसरतीसोबतच पुस्तकी ज्ञान दिले जात असल्यामुळे भरती प्रक्रियेसाठी उपयुक्त ठरत आहे. पुढील काही महिन्यांमध्ये विविध भरती होणार असल्याने अकॅडमीने नव्या बॅचसाठी तयारी सुरू केली आहे.
बेळगाव, गोवा, कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील तरुणांना देशसेवेमध्ये रूजू होण्यासाठी अकॅडमी प्रशिक्षण देत आहे. लोकमान्यचे संस्थापक अध्यक्ष व चेअरमन किरण ठाकुर यांच्या प्रेरणेतून अकॅडमी कार्यरत आहे. सैन्यदलातील मोठय़ा हुद्दय़ांवर काम करून निवृत्त झालेले अधिकारी प्रशिक्षण देत आहेत. त्यामुळे अल्पावधीत अकॅडमीचा नावलौकिक झाला आहे.
संपर्क साधण्याचे आवाहन
अकॅडमीतर्फे प्रशिक्षण काळात राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात येते. टेनिंगसाठी उत्तम मैदान, जिम्नॅशियम हॉल, सर्व प्रकारची पुस्तके व सर्वात महत्त्वाचे म्हणजे सैन्यदलात काम केलेले कर्मचारी यामुळे परिपूर्ण प्रशिक्षण याठिकाणी मिळू शकते. इच्छुकांनी राणी चन्नम्मानगर येथील वेद मंदिर येथे अकॅडमीच्या कार्यालयात संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी 0831-2420120 किंवा 7022469544 या क्रमांकाशी संपर्क साधण्याचे आवाहन अकॅडमीतर्फे करण्यात आले आहे.