इच्छुक विद्यार्थ्यांनी अकॅडमीमध्ये नावनोंदणी करण्याचे आवाहन : शारीरिक-लेखी परीक्षेचे देण्यात येते प्रशिक्षण
प्रतिनिधी / बेळगाव
लोकमान्य संस्थेच्या माध्यमातून बँकिंग, शिक्षण, विमा, हॉटेल्स, रिसॉर्ट अशा विविध मल्टिपर्पज व्यवसायांशिवाय सामाजिक उपक्रम संस्थेच्यावतीने राबविले जातात. लोकमान्य समूहाचे प्रेरणास्त्रोत किरण ठाकुर यांच्या कल्पक दृष्टिकोनातून हजारो युवक-युवतींना रोजगार मिळाला आहे. बेळगाव तसेच परिसरातील युवकांना मिलिटरी प्रशिक्षण मिळावे, या उद्देशाने लोकमान्य मिलिटरी टेनिंग अकॅडमी सुरू करण्यात आली. अल्पावधीतच या टेनिंग अकॅडमीमधून अनेक विद्यार्थी भारतीय सेनेसोबत इतर निमलष्करी दलांमध्ये दाखल झाले आहेत.
‘सक्षम एवमं प्रगती’ या ब्रीद वाक्मयानुसार लोकमान्य टेनिंग अकॅडमीची घोडदौड सुरू आहे. भारतीय सेना, वायुसेना, नौदल, मिलिटरीशी समांतर असणाऱया बीएसएफ, आयटीबीपी, आसाम रायफल्स, सीआरपीएफ, सीआयएसएफ इत्यादींमध्ये भरती व्हायचे असेल अशा विद्यार्थ्यांना येथे शारीरिक व लेखी परीक्षेचे प्रशिक्षण देण्यात येते. याचबरोबर एसएसबी, ओटीए, एडीए यांचेही प्रशिक्षण देण्यात येते. लोकमान्यचे सीएसओ, निवृत्त लष्कर अधिकारी कर्नल दीपक गुरुंग यांच्यासोबत इतर लष्करी अधिकाऱयांकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देण्यात येते.
आवश्यक पात्रता
टेनिंग अकॅडमीमध्ये प्रवेश घेणारा प्रशिक्षणार्थी हा 10 वी, 12 वी व कोणत्याही क्षेत्रामध्ये टक्केवारीप्रमाणे उत्तीर्ण हवा. 17 वर्षे 6 महिने ते 23 वर्षे (सैनिकांसाठी), तर 17 वर्षे 6 महिने ते 25 वर्षे (अर्धसैनिकांसाठी) वयोमर्यादा आवश्यक आहे. सोबत दहावी व बारावीचे गुणपत्रक, जातीचा दाखला, डोमिसाईल पत्र, शाळा सोडल्याचा दाखला, ग्रामपंचायतीचा दाखला, वर्तणुकीचा दाखला, कलर फोटो या सर्वांच्या तीन झेरॉक्स प्रति नोटरीसह घेऊन कार्यालयात
भेटावे.
लवकरच नवीन बॅच सुरू
कोरोनामुळे मागील काही महिने मिलिटरी टेनिंग बंद ठेवण्यात आले होते. परंतु आता कोरोना आटोक्मयात येत असल्यामुळे पुन्हा एकदा लष्करी प्रशिक्षण सुरू केले जाणार आहे. लवकरच लोकमान्य मिलिटरी टेनिंग अकॅडमीची नवीन बॅच सुरू होणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी वेदमंदिर, राणी चन्नम्मानगर, बेळगाव येथील टेनिंग अकॅडमीमध्ये नावनोंदणी करावी. अधिक माहितीसाठी 0831-2420120 किंवा 9686814008, 7022469543 या क्रमांकांशी संपर्क साधावा, असे आवाहन अकॅडमीतर्फे करण्यात आले आहे.