प्रतिनिधी / बेळगाव
लोकमान्य सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी लोकमान्य रंगमंदिर येथे खेळीमेळीत झाली. यावेळी व्यासपीठावर लोकमान्य सोसायटीचे चेअरमन किरण ठाकुर, व्हा. चेअरमन डॉ. दामोदर वागळे, संचालक गजानन धामणेकर, पंढरी परब, सुबोध गावडे, अजित गरकट्टी, सेवंतीलाल शहा, विठ्ठल प्रभू, प्रभाकर पाटकर, अनिल चौधरी, गायत्री काकतकर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना किरण ठाकुर म्हणाले, लोकमान्यच्या माध्यमातून लोककल्प फौंडेशनतर्फे कणकुंबी परिसरातील गावातून आरोग्य शिबिर, नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. तसेच गावातील महिलांनी तयार केलेल्या विविध साहित्याला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी लोकमान्य सोसायटी प्रयत्नशील आहे. गावे आर्थिकदृष्टय़ा सक्षम करण्यासाठी आर्थिक संस्थांनी आता गावाकडे वळावे असेही त्यांनी स्पष्ट केले. प्रारंभी विनायक जाधव यांनी उपस्थित सभासदांचे स्वागत केले. स्नेहा कुलकर्णी व राघवेंद्र कारेकर यांनी वार्षिक अहवाल सादर केला. सीएफओ वीरसिंग भोसले यांनी 2021 -22 च्या वार्षिक अंदाजपत्रकाचे वाचन केले. सीईओ अभिजित दीक्षित यांनी आपले विचार मांडले. सी. ए. अविनाश दीक्षित यांनी ऑडिट रिपोर्टचे वाचन केले.