केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांचे गौरवोद्गार
पुणे / प्रतिनिधी
केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी शनिवारी (02 ऑक्टोबर ) `लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड’च्या पुणे विभागीय कार्यालयाला भेट दिली.
यावेळी लोकमान्य सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकूर यांनी डॉ. भागवत कराड यांचे शाल व पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष श्री. विद्याधर अनास्कर, लोकमान्य सोसायटीच्या पुणे विभागाचे व्यवस्थापक सुशील जाधव व लोकमान्य अर्थवार्ताचे सल्लागार संपादक आयआयएस योगेश्वर गंधे, आदी मान्यवरांची व विभागीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थिती होती.
यावेळी आयोजित प्रासंगिक सत्कार कार्यक्रमात प्रास्ताविक करताना अध्यक्ष किरण ठाकूर यांनी सोसायटीच्या विविध उपक्रमांची माहिती दिली, तर सत्काराला उत्तर देताना केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत यांनी सांगितले की, लोकमान्य सोसायटीची आतापर्यंतची कामगिरी कौतुकास्पद अशीच आहे. तळागाळातील लोकांना त्यांचे जीवनामान उंचावण्यासाठी सोसायाटीने सादर केलेल्या योजनांमधून विविध स्वरूपात केलेली मदत ही अनुकरणीय आहे.
ते पुढे म्हणाले की, केंद्र शासनाने सहकार मंत्रालयाची स्थापन करीत एक मोठा व लोकहितकारक निर्णय घेतला आहे. सहकाराचे नवे धोरण आणण्याची तयारी सुरू असून, याकामी लोकमान्य सोसायटीच्या सहकार क्षेत्रातील कामगिरी व अनुभवाचा विचार करता सोसायटीने सर्वंकष, अशा धोरणांच्या निर्मितीसाठी महत्त्वाची भूमिका बजावावी, असे आवाहनही डॉ. कराड यांनी केले.