30 नोव्हेंबरपर्यंत संधीचा ग्राहकांनी लाभ घेण्याचे आवाहन
प्रतिनिधी / बेळगाव
लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीने आपल्या ग्राहकांसाठी 10 टक्के व्याजदर मिळविण्याची अभूतपूर्व संधी येत्या केवळ पाच दिवसांसाठी उपलब्ध केली आहे. येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत ग्राहकांनी ठेवलेल्या ठेवींवर लोकमान्य सोसायटी 10 टक्के व्याज देणार आहे. 1 डिसेंबरपासून व्याज दरात कपात करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी या पाच दिवसांच्या कालावधीत आपली ठेव लोकमान्य सोसायटीमध्ये ठेवावी आणि 10 टक्के व्याज दराचा लाभ घ्यावा, असे आवाहन सोसायटीने केले आहे. ग्राहकांना घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने सुद्धा गुंतवणूक करता येणार आहे. नागरिकांनी लोकमान्य सोसायटीच्या विविध योजनांच्या माहितीसाठी 18002124050 या क्रमांकावर संपर्क साधावा. त्याचप्रमाणे ठेव ठेवू इच्छिणाऱया ग्राहकांनी www.त्दक्स्aहब्aदहत्ग्हा.म्दस्/dाज्देग्t या संकेतस्थळावर संपर्क साधावा, असे आवाहन सोसायटीने केले आहे.