प्रतिनिधी /वास्को
लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटीव्ह सोसायटीतर्फे वास्को परिसरातील इयत्ता पहिली ते पाचवी पर्यतच्या विद्यार्थ्यांसाठी दि. 17 जुलै रोजी ऑनलाईन माध्यमाद्वारे चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
सदर स्पर्धा इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी असेल. स्पर्धकांना आयोजकांनी दिलेल्या विषयावर चित्र रेखाटावे लागणार असून स्वतःचा कोणताही रंग वापरून चित्र रंगवावे. या चित्रकलेसाठी लोकमान्य सोसायटी वास्को शाखा व नवेवाडे शाखेतर्फे पेपर देण्यात येईल. स्पर्धकांनी स्पर्धेचे अर्ज व चित्रकलेचा पेपर दि. 17 जुलैपूर्वी वास्को व नवेवाडे शाखेतून स्विकारावेत. रविवार दि. 18 रोजी स्पर्धकांनी रेखाटलेली चित्रे व अर्ज सोमवार दि. 19 रोजी लोकमान्य सोसायटीच्या वास्को व नवेवाडे शाखेत आणून द्यावेत.
प्रथम तीन विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे देण्यात येतील. स्पर्धकांना रेखाटलेल्या चित्रांचे दोन फोटो व 15 सेकंदाचा व्हिडिओ पाठवावा लागेल. स्पर्धेचे अर्ज लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटीव्ह सोसायटी, वास्को शाखा, घर क्र. 14/136, फादर जुझे वाझ मार्ग, ‘लक्ष्मी विहार’ तळ मजला वास्को स्क्वेर रेस्टॉरंटसमोर वास्को व नवेवाडे शाखा, मारूती मंदिराजवळ येथे उपलब्ध असतील. अधिक माहितीसाठी वास्को शाखेचे वरिष्ठ शाखा व्यवस्थापक वासु आमोणकर (9823154195) किंवा नवेवाडे शाखा व्यवस्थापक मनिषा साळगांवकर 9823824224 यांच्याशी संपर्क साधावा.