प्रतिनिधी /बेळगाव
नववर्षानिमित्त सहकार क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या लोकमान्य सोसायटीतर्फे लोकमान्य धनलाभ 2022 ठेव व सुनिधी 2022 ठेव योजना सुरू करण्यात येत आहेत. ठेवीदार आणि सभासदांकडून पारंपरिक योजनांना उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाल्याने लोकमान्य सोसायटीने 1 एप्रिल 2022 पासून दोन नवीन योजना सुरू केल्या आहेत.
अल्पकालावधीच्या गुंतवणुकीवर आकर्षक व्याजदरासह उत्तम परतावा, हे या दोन्ही योजनेचे वैशिष्टय़ आहे. लोकमान्य धनलाभ 2022 ठेव योजनेत ठेवीदार 15 महिन्यांसाठी 10000 रु. किंवा एक हजाराच्या पटीत गुंतवणूक करू शकतात आणि त्यांना 8.75 टक्के दराने आकर्षक व्याज मिळेल. ठेवीच्या कमाल रकमेवर कोणतीही कमाल मर्यादा नाही. या योजनेत ज्येष्ट नागरिक आणि 10 लाख किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम एक पावती ठेव असलेल्या मोठय़ा ठेवीदारांना 0.50 टक्के अतिरिक्त व्याज मिळेल.
लोकमान्य सुनिधी 2022 ठेव योजनेत ठेवीदार 250 दिवसांसाठी 10000 रु. किंवा एक हजाराच्या पटीत गुंतवणूक करू शकतात आणि त्यांना 7.40 दराने आकर्षक व्याज मिळेल. ठेवीच्या कमाल रकमेवर कोणतीही कमाल मर्यादा नाही. या योजनेत ज्ये÷ नागरिक आणि 10 लाख किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम एक पावती ठेव असलेल्या मोठय़ा ठेवीदारांना 0.50 टक्के अतिरिक्त व्याज मिळेल.
या दोन्ही योजनांमध्ये ठेवीदार ठेव रकमेच्या 90 टक्क्मयांपर्यंत कर्ज घेऊ शकतात. मुदतपूर्व ठेवी काढण्याची मुभाही या योजनेत आहे. या दोन्ही योजना 30 जून 2022 पर्यंत वैध आहेत. अधिक माहितीसाठी लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्या शाखेशी किंवा टोल फ्री क्रमांक 18002124050 वर संपर्क साधावा. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्या 213 शाखा कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा आणि दिल्ली येथे कार्यरत आहेत.