प्रतिनिधी /बेळगाव
लोकमान्य सोसायटीतर्फे इस्लामिया गर्ल्स हायस्कूल कॅम्पमध्ये मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. कोडकणी आय सेंटरतर्फे शाळेतील विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली.
मुख्याध्यापक बी. सी. सावनूर यांचा कॅम्प शाखेचे ब्रँच मॅनेजर रोझारिओ गामा यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. डॉक्टर कोडकणी आय सेंटरमधील तपासणीसाठी आलेल्या स्टाफ नर्सचा सत्कार कोनवाळ गल्ली शाखेचे ब्रँच मॅनेजर सचिन कावळे व रामलिंग खिंड गल्ली शाखेच्या ब्रँच मॅनेजर सुनिता सातेरी यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन करण्यात आला.
सदर तपासणी शिबिर यशस्वी करण्यासाठी विनायक पाटील, अंकिता चौगुले, तेजश्री कपिलेश्वरी, अनिल शहापूरकर, सुभाष सुवारे व नागेश पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी कॅम्प शाखेचे असिस्टंट ब्रॅंच मॅनेजर रोहन मेहेंदळे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.