प्रतिनिधी / बेळगाव
लोकमान्य सोसायटी अनगोळ माळ शाखेमध्ये दि. 30 रोजी संस्थेच्या सभासद ठेवीदारांचा ग्राहक मेळावा आणि वाढदिवस असा संयुक्त कार्यक्रम साजरा करण्यात आला. प्रारंभी शाखा व्यवस्थापक संदेश पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी अनंत कुलकर्णी, सरस्वती सामंत, सुमा कट्टी, सोनाली बर्वे, रजनी खाडीलकर, मेघना कुलकर्णी, प्रकाश जोशी आदींचा वाढदिवस साजरा करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. संस्थेच्या विविध योजनांची माहिती सागर कांबळे यांनी करून दिली. ठेवीदार वसंत दांडेकर, नागेशराव सरदेसाई यांनी मनोगत व्यक्त केले. शाखेचे साहाय्यक व्यवस्थापक कीर्ती शहापूरकर, पद्मश्री अण्णोजी, अनिकेत भोगण आदी उपस्थित होते.