ऑनलाईन टीम / ठाणे :
कळवा-मुंब्रा स्थानकादरम्यान लोकलमधून तीन प्रवासी पडले. या पैकी एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.
दरम्यान, जखमींवर कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातात जखमी झालेले प्रवासी मुंब्रा येथील राहणारे आहेत.
कल्याणकडून आधीच गर्दीने भरून आलेल्या लोकलमध्ये कळवा स्थानकात मोठय़ा संख्येने प्रवासी चढले. मात्र, या गर्दीमुळे प्रवाशी लोकलबाहेर फेकले गेले.