ऑनलाईन टीम
देशात कोरोना संसर्गाचा वेग झपाट्याने वाढत आहे. यातच आज, रविवारी लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यानंतर त्यांना उपचारासाठी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. बिर्ला यांची प्रकृती स्थिर असून त्याचे सर्व रिपोर्ट सामान्य असल्याचे एम्स रुग्णालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
बिर्ला यांची चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे संसदेच्या सध्याच्या अधिवेशनावर याचा कसा परिणाम होईल हे आता पहावे लागणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि प्रह्लाद पटेल यांच्यासह ३० खासदारांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर गेल्या वर्षी संसदेचे पावसाळी अधिवेशन रद्द करण्यात आले होते.
देशात गेल्या २४ तासांत ४३,८४६ नवीन बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यानंतर देशातील एकूण रुग्णाची संख्या १.१५ कोटींपेक्षा जास्त झाली आहे. देशात आता 3.०९ लाखांहून अधिक अॅक्टीव प्रकरणे आहेत तर १.११ कोटी लोक बरे झाले आहेत.