ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
राष्ट्रपती भवन नंतर आता लोकसभा सचिवालयात ही कोरोनाने प्रवेश केला आहे. कारण लोकसभा सचिवालयात काम करत असलेल्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभेतील एका स्वच्छता कर्मचाऱ्यास कोरोनाची लागण झाली आहे. सध्या दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
संसदेचे अधिवेशन स्थगित केल्यापासून हा कर्मचारी घरीच होता. मात्र, गेल्या दहा दिवसांपासून त्याला बरे वाटत नसल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर तब्येत सुधारल्याने त्याला घरी सोडण्यात आले.
मात्र काही दिवसांनी त्याला परत त्रास सुरू झाला असता खबरदारी म्हणून त्याची कोरोनाची चाचणी केली असता त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले.
दरम्यान, प्रशासनाकडून संबधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी करण्यात आली आहे. अन्य सर्वांमध्ये कोणतीही लक्षणे दिसत नाही आहेत.