संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली माहिती
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान संसदेत एकूण 13 विधेयके मांडण्यात आली, ज्यातील 12 लोकसभेत आणि एक राज्यसभेत सादर करण्यात आले. तर लोकसभेत 13 आणि राज्यसभेत 11 विधेयके संमत झाली आहेत. या अधिवेशनात 2021-22 आणि जम्मू-काश्मीरच्या अनुदानासाठी पुरवणी मागण्या मांडण्यात आल्याची माहिती केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी गुरुवारी दिली आहे.
विरोधी पक्षांनी 7 एप्रिल रोजी राज्यसभेचे कामकाज स्थगित करण्याची विनंती केली होती. सर्व राजकीय पक्ष रामनवमी आणि अन्य सणांमुळे 7 एप्रिल रोजी सभागृह स्थगित करण्यावर सहमत झाले होते असे जोशी यांनी सांगितले आहे.