प्रतिनिधी / सांगली
सांगलीवाडीच्या वॉर्ड 13 मधील त्रिशूल घाटावर सांगली महापालिका आणि रॉयल कृष्णा बोट क्लब यांच्या समवेत स्वच्छ करण्यात आली. यावेळी मनपाच्या मदतीने हा घाट स्वच्छ करण्यात आला.
स्वच्छ सर्व्हेक्षण 2021 अंतर्गत मनपा क्षेत्रात आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छतेची कामे हाती घेण्यात आली आहेत. यामध्ये सांगली मिरजेच्या तसेच सांगलीवाडीच्या नदीवरील घाटाची स्वच्छताही केली जात आहे. सोमवारी महापालिका आणि रॉयल कृष्णा बोट क्लबच्या संयुक्त विद्यमाने सांगली वाडीचा त्रिशूल घाट स्वच्छ करण्यात आला. यावेळी संपूर्ण घाट परीसराची मशीनद्वारे स्वच्छता करण्यात आली.
या मोहिमेत मनपाचे स्वछता निरीक्षक किशोर कांबळे, रॉयल कृष्णा बोट क्लबचे प्रताप जामदार, मुकादम उदय कुदळे, स्वछता कर्मचारी वैभव कांबळे, सुनील कदम, विशाल सूर्यवंशी, सुनील डोंबाळे आदींनी सहभाग घेतला.