आधीच्या प्रवेशपत्रावरच मिळणार परीक्षा केंद्रावर प्रवेश
प्रतिनिधी/ मुंबई
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) पुढे ढकलण्यात आलेली राज्यसेवा पूर्वपरीक्षा आता 21 मार्च रोजी घेण्यात येणार आहे.आधीच्या 14 मार्च रोजीच्या परीक्षेसाठी देण्यात आलेल्या प्रवेशपत्रावरच विद्यार्थ्यांना परीक्षा पेंद्रांवर प्रवेश देण्यात येणार आहे.
21 मार्चनंतर होणाल्ल्या परीक्षा या नियोजित वेळापत्रकानुसारच होणार असून त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असे आयोगाने शुक्रवारी स्पष्ट केले.
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 27 मार्चला तर महाराष्ट्र दुययम सेवा अराजपत्रित गट -ल्ल्ब संयुक्त पूर्व परीक्षा 11 एप्रिल रोजीच घेण्यात येणार आहे.त्घ्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असेही आयोगाने म्हटले आहे.
एमपीएससीची पूर्वपरीक्षा 14 मार्च रोजी घेण्यात येणार होती.मात्र ती अचानक लांबणीवर टाकण्यात आल्याची घोषणा करण्यात आली.यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तात्काळ हस्तक्षेप करत परीक्षा आठ ते दहा दिवसात परीक्षा घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आता 21 मार्च या नव्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे.