बेळगाव / प्रतिनिधी
उद्यमबाग येथील कलाश्री ग्रुप ऑफ इंडस्ट्रिज आयोजित लाखोचे बक्षीस जिंका या भव्य योजनेच्या 14 व्या सोडतीत खानापूर तालुक्मयातील लोकोळी गावच्या पूर्वी नागेश पाटील हिने थायलंड, मलेशिया विदेशी दौऱयाची मानकरी ठरली आहे. कलाश्री उद्योग समुहाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या महिना 600 रूपये भरा व लाखोचे बक्षिस जिंका या योजनेची 14 वी सोडत घेण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे कर्नाटक राज्य ओबीसी मोर्चाचे सेपेटरी किरण जाधव, ई क्लब बेळगावचे अध्यक्ष अनंत नाडगौडा, रोटरी क्लब ऑफ सेंट्रलचे अध्यक्ष रविंद्र थोरात, रोटरी क्लब ऑफ वेणुग्रामचे अध्यक्ष अरविंद खडबडी, रोटरी क्लब ऑफ मिडटाऊनचे सदस्य सतिश नाईक, दिलीप सोहानी, कलाश्री ग्रुप ऑफ इंडस्ट्रिजचे संचालक प्रकाश डोळेकर आदी उपस्थित होते. त्यांच्या हस्तेच 14 व्या सोडत करण्यात आली. 14 वे बक्षिस खानापूर तालुक्मयाचे लोकोळी गावातील पूर्वी नागेश पाटील हिला थायलंड, मलेशिया विदेशी दौऱयाचे तिकिटाचे बक्षिस लागले आहे. तर कुसमळी येथील प्रवीण देसाई, हिंडलगा येथील मनोहर पाटील, बस्तवाड येथील सुशांत बांडगी, हंगरगा येथील मल्लाप्पा पार्लेकर, गुंजनहट्टी येथील आदित्य पाटील तर वाघवडे येथील आदिती मोनाप्पा पाटील यांना उत्तेजनार्थ सुटकेसचे बक्षिस मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. पुढील महिन्यात शेवटची सोडत होणार असून, त्यासाठी सभासदानी अपली आवडती वस्तु घेऊन जावे असे आवाहन कलाश्रीतर्फे करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे तिसरी लाखो बक्षिसांची योजनेची सुरूवात झाली असून, इच्छुकांनी याचा लाभ घ्यावा.