मुंबई-कोलकत्ता-मुंबई सायकलिंग प्रवास
वार्ताहर / परळी :
एक ध्येय वेडे महाराष्ट्रातील सायकल प्रेमींचे हिरो डॉ. अमित समर्थ हे डॉ. प्रकाश आमटे यांच्या लोक बिरादरी या प्रकल्पास आर्थिक सहकार्य मिळावे, तसेच आदिवासी भागात उत्तम क्रिडा साहित्य मिळावे यासाठी सायकलिंग करत आहेत.
डॉ. समर्थ हे जगातील सर्वात लांब पल्ल्याचे सायकलिंग करणारे आहेत. त्यांनी ‘द रेड बुल ट्रान्स सेबेरिअन 9100 किमी, सुप्रसिध्द द रेस अक्रोस अमेरिका 5000 किमी (आयएएएम) या यशस्वीरित्या पुर्ण केल्या आहेत. लोक बिरादरीला या प्रकल्या सहकार्य मिळावे, म्हणून त्यांनी आता गेट वे ऑफ इंडिया ते बेंगळूर, चेन्नई, कोलकाता असा प्रवास सुरू केला आहे. यासाठी ते साधारण 30 किमी प्रती तास असे सायकलिंग करत आहेत. डॉ. समर्थ यांनी 15 फेबुवारी रोजी सकाळी 3 वाजता गेट वे आफ इंडिया येथून सायकलिंगला सुरुवात केली आहे.
भारतातील विविध शहरातून त्यांचे स्वागत करण्यात येत आहे. सोमवारी दुपारी साताऱ्यात ए.एफ.एस.एफ च्या संस्थापिका राजवी हलगेकर, संतोष शेडगे, तुषार भोईटे, हेमल उपाधेय, प्रविण शेळके तसेच सातारा सायकलिंग क्लब यांनी त्यांचे स्वागत करुन त्यांना पुढील सायकलिंग साठी शुभेच्छा दिल्या यावेळी सातारा शहरातील खेळाडू सायकलपट्टू मोठ्या संख्येने उपस्थित होते.