वार्ताहर/ लोणंद
लोणंद-फलटण रोडवर जगताप वस्तीनजीक इंडिका व तवेरा यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोनजण जागीच ठार झाले आहेत. तर एक बाळ गंभीर जखमी झाले आहे, या घटनेची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत लोणंद पोलीस स्टेशन येथे चालू होते.
याबाबत घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी की, लोणंद-फलटण रोडवर जगताप वस्तीनजीक इंडिका कार न श्प् 14 इण्1104 व तवेरा न श्प् 14 ँA5053गाडीचा समोरासमोर भीषण अपघात झाला. यामध्ये देवदर्शनाहून परतणाऱया भाविकांसह एक लहान बाळ गंभीर जखमी झाले असून इंडिका कारमधील दोन जण जागीच ठार तर तवेरा गाडीतील चार ते पाचजण जखमी झाले आहेत. जखमींना फलटणच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद करण्याचे पोलीस स्टेशनमध्ये काम चालू होते.