प्रतिनिधी / लोणंद
लोणंद शहरात कोरोनाच्या पार्शभूमीवर शासनानी ठरवून दिलेल्या नियमानुसार सर्व दुकाने बंद असून मावा व गुटखा विकणारांना याची कोणतीही परवा नाही असे चित्र असून खुलेआम एसटी स्टँण्ड समोर मावा बनवून विक्री चालु आहे संबंधित विभाग याकडे का दुर्लक्ष करत आहेत. असा सवाल उपस्थित आहे.
लोणंद शहरात बसस्थानक परिसर व बाजार तळ येथे मावा व गुटखा यांची खुलेआम विक्री चालु असून संबंधित विभाग याकडे का दुर्लक्ष करत आहे यांना कोणते नियम नाहीत का असा सवाल उपस्थित होताना दिसत आहे.