आमदारकी, मंत्रीपदाचा देणार राजीनामा : सायंकाळी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार
प्रतिनिधी /म्हापसा
कळंगुटचे आमदार तथा कचरा व्यवस्थापनमंत्री मायकल लोबो यांनी अखेर 17 वर्षानंतर भाजपला रामराम करण्याचा निर्णय घेतला आज सोमवार दि. 10 रोजी सकाळी आपल्या मंत्रीपदाचा, आमदारकीचा राजीनामा देऊन सायंकाळी 4 वाजता ते काँगेस पक्षात प्रवेश करणार आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
मायकल लोबो हे काँग्रेस पक्षात प्रवेश करीत असल्याचे समजल्यावर शिवोली मतदारसंघातील पक्षाच्या संभाव्य उमेदवारांनी गोवा प्रभारी †िदनेश गुंडूराव यांची पणजी येथे भेट घेऊन लोबो यांना प्रवेश देण्यावर नाराजी व्यक्त केली. मात्र लोबो यांच्या प्रवेशाबाबत काहीच प्रस्ताव आपल्याकडे आला नसल्याची माहिती गुंडूराव यांनी त्या उमेदवारांना दिली.
लोबो 2005 पासून भाजपात
माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्या पुढाकाराने त्यांची तत्वनिष्ठा आणि प्रेम पाहून मायकल लोबो हे 2005 साली भाजपात दाखल झाले होते. त्यांनी 2012 निवडणुकीत कमळ निशाणीवर निवडणूक लढवून ते सलग दोन वेळा आमदार झाले. गेल्या वर्षीच त्यांना ग्रामीण विकास व घनकचरा व्यवस्थापनमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले.
सरकारवर टीका करणारे मंत्री
गेल्या वर्षभरात मंत्री लोबो यांनी सरकारवर नाराजी दाखवत भाजपवर आरोप, प्रत्यारोप करण्यास सुरवात केली होती. ते सरकारवर टीका करीत असल्याने बरेच चर्चेत आले होते. चुकीचे बोलत असल्यास आपणास मंत्रीमंडळातून काढून टाका असा इशारा त्यांनी सरकारला दिला होता. मात्र लोबो यांना मंत्रिमंडळातून काढणे सरकारला शक्य झाले नाही.
सहा माहिन्यांपासून वेगळे डावपेच
सहा महिन्यांपूर्वी मंत्री लोबो यांनी आपली पत्नी तथा पर्रा सरपंच डिलायला लोबो या शिवोली मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे घोषित केले होते. दोघेही एकाच पक्षातून निवडणूक लढविणार, असे स्पष्ट करून सर्वांनाच त्यांनी विचार करायला लावले होते. मात्र तो पक्ष कोणता असेल याची वाच्च्यता केली नाही. मात्र आता ते व पत्नी काँग्रेसच्या मार्गावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सहा आमदार निवडून देण्याचे काँग्रेसला आश्वासन
बार्देश तालुक्यातील सहा मतदारसंघावर मंत्री लोबो यांनी आपला प्रभाव असल्याचा दावा केला आहे. बार्देशातील कळंगुट, शिवोली, साळगाव, म्हापसा, थिवी, हळदोणे या सहा मतदारसंघात आमदार निवडून द्या असे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनीं लोबो यांना सांगितले असून त्यानुसार त्यांनी राहुल गांधी यांची भेट घेऊन आपण आमदार निवडून देतो, असे ठोस आश्वासन मंत्री लोबो यांनी गांधीना दिले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे………………………………………………………………………………………………………
राज्यातील सर्व राजकीय नेत्यांचे लक्ष मंत्री मायकल लोबो यांच्या निर्णयाकडे लागून राहिले आहे. ते कोणता निर्णय घेतात, भाजपात राहतात की अन्य कोणत्या काँगेस, मगो, तृणमूल पक्षात प्रवेश करतात अशा विविध अफ्ढवांना ऊत आला होता, त्यावर आता पूर्णविराम पडणार आहे. थिवीत अमन लोटलीकर, हळदोणेत तारक आरोलकर, म्हापशात सुधीर कांदोळकर, शिवोलीत †िडलायला लोबो, साळगावात केदार नाईक, कळंगुटमध्ये आपण स्वतः असे उमेदवार निवडले असल्याचे मंत्री लोबो यांनी सांगितले.
अंतिम निर्णय घेण्यासाठी मंत्री लोबो यांनी मतदारसंघातील सहाही पंचायतीच्या सरपंचाना बोलावून उद्याच्या निर्णयाबाबत माहिती दिल्याचे समजते. दरम्यान रात्री अकरा वाजता पंतप्रधानांचे निकटवर्ती शर्मा यांनी लोबो यांची भेट घेऊन मन वळविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही. सुमारे अर्धातास शर्मा यांच्याशी राजकीय समीकरणवर बैठक झाल्याचे समजते.