श्रावण महिन्यातील पहिल्याच शनिवारी अद्भूत दर्शन
वार्ताहर/ वाठार किरोली
निसर्गाने वैविध्यपूर्ण नटलेल्या ल्हासुर्णे (ता. कोरेगाव) येथील पौराणिक कथित महादेव मंदिरात नागदेवतेचे दर्शन येथील ग्रामस्थांना घडले. या मंदिराचा 14 फेब्रुवारी 2020 ला जिर्णोद्धार करण्यात आला होता. मंदिरात दरवर्षी श्रावण महिन्यात भाविकांची गर्दी असते. श्रावण महिन्यातील पहिल्याच शनिवारी येथील महादेव मंदिराची स्वच्छता करताना दुपारी 1 च्या सुमारास ग्रामस्थांना महादेवाच्या पिंडीवर विराजमान असलेल्या नागदेवतेचे अद्भूत दर्शन घडले.
यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले. श्रावण महिन्यातील पहिला शनिवार असून महादेव मंदिर ल्हासूरणे येथे पिंडीवर नागदेवतेने दर्शन देऊन त्यावर असणाया कलशातून पडणारे पाणी त्याने आपल्या तोंडात घेतले हा अदभुत योग आहे. आषाढी एकादशी दिवशीच्या दुस्रया दिवशी बारस असते त्यादिवशी सोमवार होता त्यावेळेस ही नागदेवतेने असेच दर्शन दिले होते. गावातील वृद्ध लोक सांगतात की असा अदभुत योग हा पहिल्यांदाच पाहण्यात आल्याचा योग हा ल्हासुरर्णेकरांना मिळाला आहे. हे दृश्य पाहण्यासाठी आख्खा गाव लोटला होता.